16/04/2026
तिची थरथर थांबवण्यासाठी आदित्यने तिला पकडलं, पण ते नेमकं कंबरेत. त्यातून तिने साडी नेसली होती. कंबरेच्या उघड्या त्वचेला त्याचा बोटांचा स्पर्श होताच ती सैरभर झाली. अंगात झिणझिण्या येऊ लागल्या.
तिला वर्षानुवर्षं पछाडणारी ती नजर ... ते डोळे पाहताच, पुढच्या क्षणाला सगळं जग तिच्याभोवती फिरु लागलं. डोकं गरगरायला लागलं असतानाही तिने कसेबसे डोळे वटारले …
👿💀🤬😱😡👻👿
तिची आठवण येताच त्याच्या माथ्यावरची एक शीर तडतडायला लागली. समोरच्या टीपॉय खालचा पेपर घेऊन त्याने चेहऱ्यासमोर धरला, मग डोळे मिटून एक खोल श्वास घेतला.
आजवर नियतीने त्याच्यावर कितीतरी आव्हानं टाकली पण ती त्याला कधी कठीण वाटली नाहीत. पण प्रियांका वेगळीच होती ... कारण ... ती स्वतःच एक आव्हान होती ... आणि आता तीच समोर येतेय म्हटल्यावर त्याला एक थ्रिल जाणवलं.
चेहरा झाकलेला असूनही त्याला ती तिथे आलेली जाणवत होती. तिच्या बांगड्यांची ती नाजूक किणकिण ऐकून त्याला पुन्हा कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली.
डोळ्यासमोर धरलेला पेपर खाली टाकून तिची एक झलक पाहण्याची इच्छा मनात कुठेतरी खोलवर उमटली. 'आता नाही!' त्याचं आतलं मन गुरगुरलं, 'चक्रीवादळ येतंय समोरून'‼️
प्रियांका ट्रे घेऊन दिवाणखान्यात शिरली तेव्हा तिला बघायला आलेला मुलगा पेपर च्या मागे लपलेला पाहून तिला आश्चर्य वाटलं. इतका कुरूप आहे का की स्वतःचा चेहरा लपवतोय …. की त्याला मला बघायचंच नाहीय? जबरदस्ती आणलाय का त्याला इथे?
ती थोड्या नाराजीनेच सोबत आलेल्या मुलाच्या आईकडे वळली तसे तिचे पप्पा म्हणाले, “वहिनी, माझी मुलगी सिंधी कुटुंबात जन्मली असली तरी ती पूर्णतः महाराष्ट्रीयन आहे, कारण ती आमच्या मराठी शेजाऱ्यां बरोबर मोठी झालीय. ती इतकी चांगली मराठी बोलते की तिने आडनाव सांगितल्याशिवाय कोणालाच ती अमराठी वाटत नाही." मग प्रियांका कडे वळून म्हणाले, "प्रिया, तू त्यांच्याशी मराठीत बोल ना."
"नमस्कार काकू" प्रियांकाने तिला बघायला आलेल्या मुलाच्या आई सोबत बोलायला सुरुवात केली. "तुमचा प्रवास कसा झाला? घर शोधायला काही अडचण नाही ना आली?”
सुमतीने उत्तर द्यायला तोंड उघडलं पण त्याआधी बोलला तो तिचा मुलगा, "प्रवास? बांद्रा - वरळी सी लिंक वरून दहा मिनिटांच्या ड्राईव्हला प्रवास म्हणतात का? काही अतिशहाण्यांना वाटतं कि आपणच भाषेचे प्रकांड पंडित, पण खरं तर त्यांना काहीच येत नाही.”
ते शब्द उच्चारता क्षणी आदित्यला पश्चाताप झाला.
आणखी थोडा वेळ तोंड बंद ठेवलं असतं तर? ती असली संधी सोडतेय थोडीच! तिला लगेच कळलं की त्या पेपर च्या मागे कोण आहे ते! तिच्याशी असं वागणारा, तिला सतत क्रॉस करणारा जगात फक्त एकच माणूस होता.
आदित्य !!!!
उलट उत्तर, अगदी प्रतिक्षिप्त क्रिया झाल्याप्रमाणे आलं.
“काही मूर्ख लोक ना स्वतःला फार शहाणे समजतात पण त्यांना शब्दांमागच्या भावना ओळखायची अक्कलच नसते. स्वतःला फार बुद्धिमान समजणारे प्रत्यक्षात असतात, डंबो."
एका वाक्यात तीन वेळा अपमान करून झाल्यावर शेवटच्या शब्दावर जोर देत तिने एका हातात चहाचा ट्रे धरून दुसऱ्या हाताने जोरात पेपर ओढला.
त्याने वर नजर केली तसं तिच्याकडे एकटक पाहतच राहिला.
गुलाबी साडी तिच्या लालसर गोऱ्या रंगावर अगदी उठून दिसत होती … छोटंसं धारधार नाक, धनुष्य बाणासारखे नाजूक गुलाबी ओठ, लांब दाट कोरीव भुवया आणि त्यांच्या खाली चॉकलेट ब्राउन रंगाचे डोळे. त्यांना मॅचिंग होतील असे त्याच रंगाचे अगदी सरळसोट सिल्की केस.
म्हणजे जेव्हा आजच्यासारखं उठसूट केस केमिकलने स्ट्रेट करायची फॅशन नव्हती ना, तेव्हापासून तिचे केस नैसर्गिक स्ट्रेट होते. त्याने असं ऐकलं होतं की लहानपणी तिच्या केसांना रिबिनी टिकायच्या नाहीत. मग शाळेत पाठवताना तिची मम्मी आधी रब्बर लावून त्यांच्या वरून रिबिनी बांधायची.
प्रियांका तितकीच सुंदर दिसत होती जशी त्याला आठवत होती. फरक इतकाच कि तेव्हा ती हडकुळी, चवळीची शेंग होती आणि आता मात्र एकदम हॉट … अंगाने थोडी भरलेली दिसत होती. तिच्या लिपस्टिकने मात्र त्याचं लक्ष वेधून घेतलं. इतकी वर्षं ती तीच लिपस्टिक वापरतेय?
तिने आदित्यच्या गर्द हिरव्या डोळ्यांत पाहिलं आणि त्याबरोबर तिचं आतापर्यंत आणलेलं सारं अवसान गाळून पडलं. इतक्या वर्षांनंतर त्याला स्वतःच्या घरात, तिच्या भावी वराच्या रूपात पाहून तिला जबर धक्का बसलेला!
ती पाहतच राहिली. आधी जर तो देखणा वाटत असेल तर आता जबरदस्त Handsome Hunk झालेला! जिम मध्ये जाऊन कमावलेली मोहक देहयष्टी तर होतीच, पण त्याहीपेक्षा जास्त लोभस होतं ते चेहऱ्याभोवती असलेलं बुद्धीचं तेज. आणि इतक्या वर्षांची परिपक्वता. शून्यातून विश्व उभारलेलं, त्यामुळे आलेला अहंकार आणि बेदरकार पणा सुद्धा त्याच्या आकर्षणात अजूनच भर टाकत होते. पण तो मात्र भेदक नजरेने तिच्याकडे बघत होता.
तिला वर्षानुवर्षं पछाडणारी ती नजर ... ते डोळे पाहताच, पुढच्या क्षणाला सगळं जग तिच्याभोवती फिरु लागलं. ट्रे धरलेले तिचे हात थरथरू लागले!
आदित्य ताबडतोब उठला आणि तिच्या हातातून ट्रे घेतला आणि तिची थरथर थांबवण्यासाठी त्याने तिला पकडलं, पण ते नेमकं कंबरेत. त्यातून तिने साडी नेसली होती. कंबरेच्या उघड्या त्वचेला त्याचा बोटांचा स्पर्श होताच ती सैरभर झाली. अंगात झिणझिण्या येऊ लागल्या. डोकं गरगरायला लागलं असतानाही तिने कसेबसे डोळे वटारले.
त्याला आपली चूक समजली आणि त्याने हात तिच्या खांद्यावर नेला, तिला स्थिर करण्यासाठी. आता त्याला तिला नीट पकडता येत होतं. आणि तिलाही त्याचं हे असं खांदयावर हात टाकणं ओळखीचं होतं ना! मग तिने स्वतःला कसबसं सावरलं.
"आदि, मी तुला स्त्रियांशी असं बोलायला शिकवलंय?" तिचे पापा.
"प्रिया, अपने घर आए मेहमानों के साथ ऐसा बर्ताव करते हैं?" त्याची आई.
दोघेही जवळजवळ एकदमच बोलले, आपापल्या मुलांकडे बघून डोळे वटारत!
मग तिचे वडील त्याच्या आईकडे वळले, “ती सहसा असं कधी वागत नाही पण असं वाटतं…. असं वाटतं…” त्यांना शब्दच सापडत नव्हते.
“माझा मुलगा तिच्यासाठी स्पेशल आहे ... हो ना बेटा?" सुमतीने चेहऱ्यावर हसू आणत तिला विचारलं.
“हो काकू! तो माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे.” त्याच्या आईला गोड स्वरात उत्तर देऊन ती त्याच्याकडे वळली आणि पुढे म्हणाली, "आम्ही एकाच कॉलेजला होतो ना."
तसं बोलताना, तिचे दात एकमेकांना घट्ट चिकटलेले त्याला माहीत होते. तिने त्याला एक विशिष्ट लुक दिला जो फक्त त्याच्यासाठी राखीव होता.
तिचे वडील गोंधळले पण लगेच सावरून म्हणाले, “वहिनी, त्यांना जुने दिवस आठवण्यासाठी थोडा वेळ देऊया. मी शेजाऱ्यांकडे जातो. तुम्ही प्रियाच्या आईसोबत किचनमध्ये थांबता का?”
सुमती तिथून निघताच आदित्यने प्रियांकाला विचारलं, “काय चाललंय हे? हा सगळा गोंधळ कशासाठी घातलाय?"
तिने स्वतःच्या तोंडावर बोट ठेवत त्याला खालच्या आवाजात बोलायची खूण केली. मग त्याच्या अगदी जवळ येत जवळ जवळ कानात बोलली, “तुझ्या मागचं पार्टीशन लाकडी आहे. आपल्या दोघांच्याही आया तिथून ऐकू शकतात. तुला इथे सीन क्रिएट करायचाय?"
त्याने नकारार्थी मान हलवली. तिचा मुद्दा बरोबर होता, पण त्याला हे काय चाललंय ते जाणून घ्यायचं होतं. तिने त्याला बसायची खूण केली आणि स्वतः शेजारी सोफ्यावर बसली. तिच्या मांड्यांचा त्याच्या पायाला हलकासा स्पर्श होताच त्याच्या पोटात फुलपाखरं बागडू लागली.
हे काय होतंय? अशा प्रकारे तिला रिस्पॉन्स द्यायला तो काही किशोरवयीन नव्हता. तरीही त्याचं शरीर का विश्वासघात करत होतं? मुली जवळ आल्या कि उत्तेजित होणं त्याच्यासाठी नवीन नव्हतं. पण आज काही वेगळंच होत होतं. हे असलं बटरफ्लाय फीलिंग ह्यापूर्वी कधीच आलं नव्हतं. अगदी तिच्यासोबतही नाही.
एकेकाळी त्याला तिची फक्त मैत्री हवी होती, पण तिने मात्र मुद्दाम वैर पत्करलं! पण मग आज मैत्रीच्या पलीकडचं हे काय होतंय? आजची उत्तेजना वेगळी होती!
आधी कधीही न झालेली!
आणि हिला ते कळलं तर?
*********
अचानक आलेल्या एका आणिबाणीच्या परिस्थितीमुळे तिला ताबडतोब लग्न करणं भाग होतं … आलेल्या पहिल्या स्थळाला न बघताच होकार तर दिला ... पण तो समोर येताच कळलं की तो होता तिच्या पूर्वायुष्यातला एक Devil‼️
ते दोघं मेडिकल कॉलेजमधे एकत्र असताना घडलेलं एक भयंकर षडयंत्र!
तिच्या मैत्रिणीचा अपघाती मृत्यू ... कोण जबाबदार होतं त्याला?
का त्याचं सावट अजूनही यांच्या आयुष्यावर?
काय होईल जेव्हा एकेकाळचे दोन वैरी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकण्यासाठी जवळ येतील?
Romance बहरायला लागेल की
तो काळा भूतकाळ उध्वस्त करेल
त्यांचे भविष्य❓
जाणून घेण्यासाठी …. एक जबरदस्त हटके अशी Romantic ❤️ Suspense Thriller कथा वाचायची असेल तर
“बेटर द डेव्हिल यू नो…”
या पूर्ण झालेल्या कथेची
लिंक 🖇️ comment किंवा
या पोस्टच्या header मध्ये मिळेल.
ही कथामलिका पूर्ण झालेली आहे.
प्रतिलिपी वरील सर्व कथामालिका फ्री आहेत, परंतु तुम्हाला पुढचा भाग फ्री होण्याची वाट न बघता पूर्ण कथा एकदम वाचायची असेल तर तुम्ही जर माझ्या प्रोफाइल वर जाऊन फक्त 25 रुपयाचे महिनाभराचे सबस्क्रिप्शन घेऊन ही तसेच माझ्या इतर पूर्ण झालेल्या कथामालिका तुमच्या सोयीनुसार एकदम वाचू शकता ... तसेच लिपीच्या चॅटरुम मधे माझ्याशी संवाद सुद्धा साधू शकता.
भेटूया मग… प्रतिलिपी वर
🌟🌟🌟🌟🌟
Prakash
#मराठीकथा
#मराठीसाहित्य
******************