21/05/2026
भारतीय संस्कृतीमध्ये काळ आणि वेळेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यातही जेव्हा 'अधिक मास' आणि 'पुष्य नक्षत्र' एकत्र येतात, तेव्हा तो केवळ एक मुहूर्त राहत नाही, तर तो एक अत्यंत दुर्मिळ आणि मंगलमयी 'सुवर्ण योग' बनतो...
हा काळ केवळ सोन्या-चांदीच्या खरेदीपुरता मर्यादित नसून, त्यामागे आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भावना, आई-वडिलांचे आशीर्वाद आणि लेकी-सुनांच्या चेहऱ्यावरील आनंद दडलेला असतो.
हिंदू पंचांगात दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास (धोंड्याचा महिना) हा श्री विष्णूंच्या उपासनेसाठी आणि पुरुषोत्तम मास म्हणून अत्यंत पवित्र मानला जातो. या संपूर्ण महिन्यात दान-धर्म आणि सत्कर्माला विशेष महत्त्व असते.
दुसरीकडे, २७ नक्षत्रांपैकी 'पुष्य नक्षत्र' हे सर्व नक्षत्रांचा राजा मानले जाते. या नक्षत्रावर सुरू केलेले कोणतेही काम किंवा केलेली खरेदी ही अक्षय्य (कधीही नष्ट न होणारी) मानली जाते. जेव्हा अधिक मासासारख्या पवित्र महिन्यात पुष्य नक्षत्राचा महामुहूर्त येतो, तेव्हा लक्ष्मी आणि नारायण दोघांचाही विशेष आशीर्वाद मिळतो.
"आपले नार्वेकर ज्वेल लॉड्री"
स्वानंद नार्वेकर
8600706232
आमच्या शाखा सांगली, पुणे मधील कोथरूड येथे आहेत.. नक्की भेट द्या आणि सेवेचा अनुभव घ्या