Pallavi’s crystal vibe

Pallavi’s crystal vibe Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pallavi’s crystal vibe, Pune.

✨ Crystal Guidance for Money, Peace & Emotional Balance
💎 Handpicked & Energised Crystals
📿 Bracelets | Pendants | Remedies
💬 Message for Crystal Guidance
📦 Pan India Shipping

🖤 टॉप ग्रेड ब्लॅक टूरमलिन टम्बल 🖤तुमच्या protection आणि negativity removal साठी एक शक्तिशाली क्रिस्टल ✨💫 फायदे:• Negativ...
20/05/2026

🖤 टॉप ग्रेड ब्लॅक टूरमलिन टम्बल 🖤

तुमच्या protection आणि negativity removal साठी एक शक्तिशाली क्रिस्टल ✨

💫 फायदे:

• Negative energy absorb करण्यास मदत
• नकारात्मक नजर आणि unwanted vibes पासून protection 🧿
• Stress, fear आणि overthinking कमी करण्यास सहाय्य
• Mind ला grounding आणि stability देतो
• Positive आणि balanced energy maintain करण्यास मदत
• Confidence आणि inner strength वाढवतो
• Meditation, healing आणि daily carry साठी उत्तम

✨ तुमच्या bag, pocket किंवा workspace जवळ ठेवा

शनी जयंती २०२६ – अनेक वर्षांनी जुळून आलेला दुर्मिळ शनी अमावस्येचा योग उद्या येणारी शनी जयंती ही अतिशय विशेष आणि आध्यात्म...
15/05/2026

शनी जयंती २०२६ – अनेक वर्षांनी जुळून आलेला दुर्मिळ शनी अमावस्येचा योग

उद्या येणारी शनी जयंती ही अतिशय विशेष आणि आध्यात्मिक दृष्ट्या प्रभावशाली मानली जात आहे. कारण यंदा शनी जयंतीसोबतच शनी अमावस्येचाही दुर्मिळ योग जुळून आला आहे. असा योग नेहमीच येत नाही. अनेक वर्षांनी असा संयोग निर्माण होतो, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढते.

विशेषतः ज्या लोकांची साडेसाती, ढैय्या किंवा शनीची महादशा / अंतरदशा चालू आहे, त्यांच्यासाठी हा दिवस अधिक महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी श्रद्धेने केलेली प्रार्थना, मंत्रजप, दान आणि सकारात्मक संकल्प मानसिक स्थैर्य, संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी उपयुक्त मानले जातात.

हा दिवस फक्त पूजा किंवा उपाय करण्यापुरता मर्यादित नाही, तर आपल्या कर्मांचा विचार करण्याचा दिवस आहे. शनीदेवांना न्यायाचे आणि कर्माचे देवता मानले जाते. ते कोणावर अन्याय करत नाहीत आणि कोणावर विनाकारण रागावतही नाहीत. माणूस जसे कर्म करतो, तसे फळ शनीदेव देतात असे मानले जाते.

शनीदेवांना प्रसन्न करण्यासाठी मोठे यज्ञ किंवा महागडे उपाय करण्याची गरज नसते. चांगले कर्म, गरजूंना मदत आणि मनापासून केलेली प्रार्थना हेच सर्वात मोठे उपाय आहेत. शनीदेवांची खरी पूजा म्हणजे —प्रामाणिकपणा, मेहनत, संयम आणि चांगले कर्म.

शनीदेवांना अनेकजण भीतीने पाहतात, पण खरं तर शनीदेव हे कर्माचे न्यायाधीश आहेत. ते व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. ज्यांचे कर्म प्रामाणिक, मेहनतीचे आणि सत्याचे असते, त्यांच्यावर शनीदेव नेहमी कृपादृष्टी ठेवतात. शनीदेव शिक्षा देण्यासाठी नाही, तर जीवनाला योग्य मार्गावर आणण्यासाठी ओळखले जातात.

अमावस्या ही ऊर्जा शुद्ध करण्याची रात्र मानली जाते. आणि जेव्हा ती शनिवारी येते, तेव्हा शनीतत्त्व अधिक प्रभावी होते. त्यामुळे हा दिवस नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी,मानसिक स्थैर्यासाठी आणि जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.या दिवशी केलेली प्रार्थना, दान आणि सकारात्मक संकल्प यांना विशेष महत्त्व असते.

🙏🏻या दिवशी करता येणारे छोटे आणि सोपे उपाय

🔸 सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ आणि साधे कपडे परिधान करा.

🔸 शनीदेवांसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

🔸 “ॐ शं शनैश्चराय नमः” या मंत्राचा श्रद्धेने जप करा.

🔸 काळे तीळ, उडीद डाळ किंवा अन्नदान गरजूंना द्या.

🔸 कावळे, कुत्रे किंवा इतर प्राण्यांना अन्न द्या.

🔸 वृद्ध व्यक्ती, गरीब लोक आणि मेहनत करणाऱ्या कामगारांचा आदर करा.

🔸 कोणाचे मन दुखावू नका आणि शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा.

सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे — आपले कर्म चांगले ठेवणे.कारण शनीदेवांना दिखावा नाही, तर सत्य आणि प्रामाणिकपणा प्रिय आहे.या पवित्र शनी जयंती आणि शनी अमावस्येच्या दिवशी आपण सर्वांनी एक संकल्प करूया —
“मी माझ्या कर्मांमध्ये प्रामाणिक राहीन, कोणाचे वाईट करणार नाही आणि सकारात्मकतेने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करीन.”

🙏🏻शनीदेवांची कृपा सर्वांवर राहो.
नकारात्मकता दूर होवो, जीवनात स्थैर्य, संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जा लाभो. 🙏

🤍 खूप overthinking, stress आणि restless mind त्रास देतोय का?Howlite — एक असा crystal जो तुमच्या मनाला शांतता देण्यासाठी ...
06/05/2026

🤍 खूप overthinking, stress आणि restless mind त्रास देतोय का?

Howlite — एक असा crystal जो तुमच्या मनाला शांतता देण्यासाठी ओळखला जातो ✨

• ताण आणि anxiety कमी करण्यात मदत
• मन शांत ठेवून overthinking control करायला support
• patience आणि emotional balance वाढवतो
• better sleep साठी beneficial energy 🤍

हा bracelet फक्त सुंदर नाही, तर तुमच्या daily life मध्ये calmness आणि positivity आणण्यासाठी तयार केला आहे 🌿

✨ Pure & Authentic crystals only
✨ Cleansed & Energized before dispatch

जर तुम्हाला तुमच्या life मध्ये शांतता आणि balance हवे असेल — हा bracelet तुमच्यासाठी perfect आहे 🤍

📩 Order साठी DM करा
(Customization available)

02/05/2026

Another day, another set of orders dispatched ✨
Thank you for choosing us 🙏
Gratitude

डाउटफुल माइंड आणि त्याचा परिणाम…काही लोकांचा स्वभावच असा असतो —एक प्रश्न संपायच्या आधीच दहा नवीन प्रश्न तयार असतात.“हे ख...
30/04/2026

डाउटफुल माइंड आणि त्याचा परिणाम…

काही लोकांचा स्वभावच असा असतो —
एक प्रश्न संपायच्या आधीच दहा नवीन प्रश्न तयार असतात.

“हे खरंच काम करेल का?”
“हे ओरिजिनल आहे का?”
“Authenticity certificate मिळेल का?”
“हे खरं मी कसं ओळखायचं?”
“सर्टिफिकेटचे चार्जेस एवढे का?”
“साइड इफेक्ट तर नाही ना?”
“मला result कधीपर्यंत मिळेल?”

Fair enough असे questions

पण अगदी फोनवर अर्धा–पाऊण तास देऊन,सगळी माहिती शांतपणे समजावून सांगितल,प्रत्येक डाउट clear केला…
तरीही —पुन्हा तेच तेच प्रश्न repeat होत राहतात.

आणि इथेच थांबत नाही…

कुरिअर आणि डिस्पॅचची complete माहिती दिलेली असते
कुरिअर प्रोसेसिंगला वेळ लागतो,ब्रेसलेट आधी energize करून मगच dispatch केलं जातं,हे सगळं स्पष्ट सांगितलेलं असतं.

तरीही —
“माझं कधी डिस्पॅच होईल?”
“कुरिअर निघालं का?”
“अजून मला मिळालं नाही…”
“कुठपर्यंत आलं आहे?”

ट्रॅकिंग डिटेल्स दिलेल्या असतात…
पण स्वतः ट्रॅक करण्यापेक्षा repeated messages करणं चालूच राहतं.

आणि सगळ्यात interesting भाग —
कुरिअर आदल्या दिवशीच dispatch केलेलं असतं…
आणि दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी 6–7 वाजताच मेसेज

“मला अजून कुरिअर मिळालं नाही.”

म्हणजे process ला लागणारा वेळ,logistics reality आणि patience —हे सगळं completely ignore केलं जातं.

कारण प्रश्न प्रॉब्लेम नसतो,माइंडसेट प्रॉब्लेम असतो.

आणि जेव्हा प्रॉडक्ट मिळतं…
तेव्हा फक्त 1–2 दिवसातच verdict तयार —
“मला काहीच फरक जाणवत नाहीये.”

पण खरं काय आहे?कोणतीही गोष्ट — मग ती crystals असो किंवा life मधली कोणतीही process —
ती काम करण्यासाठी वेळ, विश्वास आणि positivity लागते.डाउटफुल माइंड सतत negativity generate करतं…आणि जिथे negativity जास्त असते, तिथे results naturally block होतात.

सोपं सत्य आहे,जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीवर विश्वासच नसेल,तर ती गोष्ट तुमच्यासाठी काम करणं खूप कठीण होतं.

म्हणूनच माझं नेहमी एकच सांगणं असतं —
जर तुमचं माइंड खूप डाउटफुल असेल, तर कृपया crystals वापरू नका.कारण crystals पेक्षा आधी
तुमचा mindset align असणं गरजेचं आहे.डाउट्सला पकडून बसणारी माणसं त्यांच्या दुखालाही पकडून बसतात…

आणि त्यामुळे —
ना त्यांना peace मिळतं,
ना relationships मध्ये success,
ना life मध्ये growth.

विश्वास + पेशन्स + पॉझिटिविटी = रिझल्ट

डाउटफुल माइंड काय करतं? सतत negativity generate करतं आणि मग म्हणतं “काम नाही करत”,
कारण problem crystals मध्ये नसतो.problem तुमच्या mindset मध्ये असतो.

Simple आहे —
तुम्हाला विश्वास नाही = तुम्हाला रिझल्ट नाही

Choose what you want to hold —
Doubt… की Growth?

सनस्टोन हे पॉझिटिव्हिटी, आत्मविश्वास आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं. हे क्रिस्टल तुमच्या आयुष्यात नवी ऊर्जा आणि उत्साह घे...
29/04/2026

सनस्टोन हे पॉझिटिव्हिटी, आत्मविश्वास आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं. हे क्रिस्टल तुमच्या आयुष्यात नवी ऊर्जा आणि उत्साह घेऊन येण्यास मदत करतं.

🌞 फायदे:

* आत्मविश्वास वाढवतो आणि स्वतःवर विश्वास ठेवायला मदत करतो
* निगेटिव्हिटी दूर करून पॉझिटिव्ह विचारांना प्रोत्साहन देतो
* लीडरशिप क्वालिटी आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारतो
* मूड uplift करून आनंदी आणि एनर्जेटिक फील देतो
* स्ट्रेस आणि भीती कमी करण्यात सहाय्यक

💫 note:
मेहनत तुम्हाला करायची असते, क्रिस्टल्स त्याला सपोर्ट करण्याचं काम करतात.

Address

Pune

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6:59pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pallavi’s crystal vibe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share